Birth Anniversary Dr. S. R. Rangnathan 12/08/2024

 


                            Central Library - Knowledge Resource Centre

   Dhanwate National College, Nagpur

Birth Anniversary  Dr. S. R. Rangnathan 12/08/2024


    https://drive.google.com/drive/folders/1xIbVYHGqNYxgVhIaAXIUcAnGe6eWFa2M?usp=drive_link

        धनवटे नॅशनल कॉलेज आणि रियाsज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने धनवटे नॅशनल कॉलेज येथे डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी दिपप्रज्वलन करुन डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या फोटोला  माल्यार्पण करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. आर. एन. गोसावी, प्रमुख वक्ते डॉ. दिपक कापडे, डॉ. पराग पराडकर, ‘रियाsज’ चे प्रमुख डॉ. दिलीप म्हैसाळकर होते. डॉ. दिपक कापडे यांनी  डॉ. रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, तर डॉ. पराग पराडकर यांनी ‘रियाsज’ व ‘आणि ग्रंथोपजीविये’ अंतर्गत देण्यात येणाऱ्या  डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथपाल पुरस्कार 2024 ची घोषणा केली . ‘आणि ग्रंथोपजीविये’ ही ‘आरआयएझेड ‘ अंतर्गत कार्यरत ग्रंथपालाची  संस्था  असून महाविद्यालयीन ग्रंथपालांच्या उल्लेखनीय योगदानाची  दखल घेऊन चषक देते. हा पुरस्कार डॉ. मंजू दुबे,ग्रंथपाल  आर. एस. मुंडले महाविद्यालय यांना देण्यात आला. मागच्या  वर्षी डॉ. वैशाली दि. मालोदे यांना हा पुरस्कार मिळाला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली मालोदे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. पद्मिनी घोसेकर यांनी केले. यावेळी  ‘वाचन शपथ’ घेण्यात आली. प्रा. रवी गुंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर  कर्मचारी  व  विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

Dr. Panjabrao Deshmukh Jayanti Prize Distribution 10-02-2024

DR.A.P.J. ABDUL KALAM JAYANTI ( Wachan Prerana Diwas) 16 Oct. 2023

Diwali Ank 2023-2024