DR.A.P.J. ABDUL KALAM JAYANTI ( Wachan Prerana Diwas) 15 Oct. 2024

 


                Central Library - Knowledge Resource Centre

Dhanwate National College, Nagpur

Library Activities

2024-2025

DR.A.P.J. KALAM JAYANTI 

Dt .15 October 2024

Wachan Prerana Diwas

     धनवटे नॅशनल कॉलेजच्या  ग्रंथालयात  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली त्या निमित्याने ग्रंथालयात विद्यार्थानसाठी Book Review competition घेण्यात आली. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली माळोदे (वडनेरकर) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत कोठे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. आर. एन गोसावी, जयंती - पुण्यतिथी समिती समन्वयक डॉ. डि. सी. वानखेडे मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रा. हर्षा पिंपलकर यांनी कविता सादर केली तर बी. कॉम प्रथम वर्षाची   विद्यार्थिनी जिज्ञासा पेंडोर हिने डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच बी. ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी खुशी लाडे हिने सुद्धा डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या विषयी सांगितले व अध्यक्षीय भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी केले. अमीषा पांडे बी. कॉम. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी हिने  सूत्रसंचालन केले व आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Comments

Popular posts from this blog

Birth Anniversary Dr. S. R. Rangnathan 12/08/2023 in Student Induction Programme

Student Awareness Program 2023-2024