"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत गीता पठण दि . 08 जानेवारी 2025
Central Library - Knowledge Resource Centre
Dhanwate National College, Nagpur
2024 -2025
"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत
गीता पठण
दि . 08 जानेवारी 2025
ग्रंथालय विभाग ,मराठी विभाग आणि संस्कृत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विदयमानाने धनवटे नॅशनल महाविद्यालयामध्ये बुधवार दि. 08 जानेवारी 2025 रोजी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत सामुहिक गीता पठन कार्यक्रम आयोजन ग्रंथालयाच्या वाचन कक्षेत करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे सर यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करुन विद्यार्थ्याना गीता पठणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली माळोदे यांनी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या उपक्रमाची विस्तृत माहिती प्रास्ताविकातून विद्यार्थ्याना दिली. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. अर्चना देशमुख आणि ग्रंथपाल डॉ. वैशाली माळोदे यांनी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठन करुन कार्यक्रमाची सुरवात केली संस्कृत विभागाच्या पाध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी गीतेच्या बाराव्या अध्यायाचे सामुहिक पठन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
Comments
Post a Comment